भाजपच्या तेलंगणा राज्य परिषदेच्या बैठकीला खा.अशोक नेते यांची उपस्थिती

राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत सांगता

गडचिरोली : आगामी तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या तेलंगाना राज्य परिषदेच्या दोन दिवसीय संघटनात्मक बैठकीची शुक्रवारी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत सांगता झाली. या बैठकीत खासदार अशोक नेते हेसुद्धा सहभागी झाले होते. त्यांच्यावर तेलंगणातील निर्मल जिल्ह्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

विज्ञान भारती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनियरिंग)कॉलेज मेंडचल (हैदराबाद) येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते व राष्ट्रीय संघटन महामंत्री बी.एल. संतोष, तेलगांना प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री किसन रेड्डी यांच्या उपस्थिती दीप प्रज्वलनाने बैठकीचे उद्घाटन झाले. या बैठकीत भारतीय जनता पक्षाचे संघटनात्मक धोरण, भाजपाने केलेले कार्य, निवडणूक संमेलन, शक्ती प्रदर्शन, विश्वकर्मा योजना, कार्यकर्ता संमेलन, बुथ विजय अभियान, लाभार्थी समस्यांचे संमेलन, महिला संमेलन, युवकांचे कार्यक्रम, पंतप्रधान मोदींनी केलेल्या कार्याचा गौरव यावर राज्य परिषद सदस्यांना उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केले.

या बैठकीला प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचे तेलगांना ओबीसी आयोगाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मणजी, तरुणजी फक, भाजपच्या अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते आणि अन्य मंत्रीमहोदय व पदाधिकारी उपस्थित होते.