निवडणूक निरीक्षक पराशर यांची आरमोरी, चिमूर विधानसभा मतदारसंघाला भेट

स्ट्राँग रूमसह व्यवस्थेची केली पाहणी

गडचिरोली : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक अनिमेष कुमार पराशर यांनी आरमोरी व चिमूर विधानसभा मतदार संघात दोन दिवस भेटी देऊन निवडणूक व्यवस्थेच्या तयारीची पाहणी केली.

लोकसभा निवडणुकीसाठी या भागात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. याअंतर्गत आरमोरी विधानसभा मतदार संघातील देसाईगंज तालुक्यात तसेच चिमुर तालुक्यातील मतदान केंद्रांना भेट देवून पराशर यांनी पाहणी केली. त्यांनी देसाईगंज व चिमुर येथील स्ट्राँग रूमला भेट देवून तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला.

याप्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मानसी (आरमोरी), किशोर घाडगे (चिमुर) तसेच तहसीलदार प्रिती डुडूलकर, प्रशांत गड्डम (कोरची), श्रीधर माने व इतर अधिकारी उपस्थित होते.