गडचिरोली : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकांचा विमा काढावा म्हणून केंद्रासोबत राज्य सरकारनेही पुढाकार घेतला. शेतकऱ्यांना विम्याचा हप्ता म्हणून नाममात्र एक रुपया भरायचा होता. मात्र तरीही गडचिरोली जिल्ह्यात दिड लाख शेतकऱ्यांपैकी जेमतेम ७० हजार शेतकरी पीक विमा काढण्यासाठी सरसावले आहेत. उर्वरित ८० हजार शेतकऱ्यांनी विम्याकडे पाठ का फिरविली, हा प्रश्न अनाकलनिय ठरला आहे.


































