पोलिस ग्राऊंडवर शासकीय ध्वजारोहण, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

आकर्षक पथसंचलन व प्रात्यक्षिके, पहा व्हिडिओ

गडचिरोली : प्रजासत्ताक दिनानिमित्त गडचिरोलीत पोलिस मुख्यालयातील मैदानावर जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यात दुर्गम भाग जास्त असल्याने विकासात्मक कामे करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. परंतु आता परिस्थिती बदलत आहे. नक्षली विचारधारांना आता जिल्ह्यातून हद्दपार केले जात आहे. दुर्गम भागातील नागरिकांनी लोकशाही मुल्यांना आणि शासनाला अंगीकारले आहे. त्यामुळेच जिल्ह्याची वाटचाल आता विकासाकडे होत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मीना यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनात केले.

यावेळी पोलिस, होमगार्ड, एनसीसी, स्काऊट-गाईड आणि सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पथसंचलन केले. पोलिसांच्या श्वानपथकानेही आकर्षक प्रात्यक्षिके दाखवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्यांचा यावेळी सत्कारही करण्यात आला.

यावेळी आ.डॉ.देवराव होळी, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, प्रभारी पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अति.जिल्हाधिकारी धनाजी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पत्रकार व नागरिक उपस्थित होते.

जिल्हाधिाकरी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, आता नागरिक विविध शासकीय योजना स्विकारून विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत. रोजगार निर्मितीसाठी गडचिरोली जिल्ह्यात सद्यस्थितीत खनिज आधारीत उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू आहे. भारतमाला प्रकल्पांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातून 82.15 कि.मी.चा मार्ग जाणार असून गडचिरोली जिल्ह्यात समृध्दी महामार्ग राज्य शासनाकडून प्रस्तावित आहे. तसेच 1888 कोटी रुपये खर्च करून वडसा – गडचिरोली या 52.68 कि.मी. ब्रॉडगेज रेल्वेमार्गाची उभारणी होत आहे. जिल्हा मुख्यालयापासून 4 कि.मी. अंतरावर ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यात येणार आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुढील वर्षापासून सुरूवात होत आहे, असे सांगून शासनाच्या विविध योजनांच्या यशस्वीतेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. केंद्र आणि राज्य शासनाच्या एकत्रित प्रयत्नाने गडचिरोली जिल्ह्याची नक्षलग्रस्त, मागास अशी ओळख पुसून विकासाच्या वाटेवर अग्रेसर होत आहे, असेही जिल्हाधिकारी मीना म्हणाले.

विविक्ष क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यात गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॅा.प्रशांत बोकारे, प्रशांत शिरके, तहसीलदार महेंद्र गणवीर, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॅा.संदीप कऱ्हाळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतेंबडे, आरोग्य विभागाच्या वतीने धन्वंतरी हॉस्पीटल अॅन्ड मल्टीस्पेशालिटी सेंटरचे संचालक डॅा.अनंत कुंभारे, अजय बोडणे, पोलिस विभागातील मुंशी मासा मडावी, मोहन लच्चु उसेंडी, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने मोहित बोदेले, जयंत राऊत, आर्या ठवरे, दीक्षा वाळके, सचिन रोहनकर, अनिकेत भुरसे, संजना येलेकर, प्रतिक रामटेके, उमा सहारे, हिमांद्री गायन, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे प्रतिनिधी आदींचा समावेश होता.