गडचिरोली : पहाटेला धुके पडण्याचा प्रसंग हिवाळ्यात अनेक वेळा अनुभवायला येतो, पण गडचिरोलीकरांवर भर पावसाळ्यातच धुक्याला सामोरे जाण्याचा प्रसंग बुधवारी ओढवला.
पहाटेपासून वातावरणात दाट धुके पसरले असल्याने घराबाहेर पडणाऱ्यांची तारांबळ उडत होती. २५ मीटरच्या पलिकडचे दृष्य दिसत नसल्याने वाहनचालकांना हेडलाईट सुरू ठेवून हळूहळू वाहने चालवावी लागत होती. सकाळी फेरफटका मारायला जाणाऱ्यांनाही खबरदारी घेऊनच पुढे पाऊल टाकावे लागत होते. काही वयस्कर नागरिकांनी दाट धुके पाहून फिरायला जाण्याचा बेतही रद्द केला होता.
सकाळी ७ वाजेपर्यंत धुक्याची चादर कायम होती. त्यानंतर जसजसा सूर्यप्रकाश वाढत गेला तसतसे वातावरणातील धुके कमी होऊन पूर्ण दृष्यता आली.