रामनगरात रक्तदान व आरोग्य तपासणी, आयुष्यमान भारत कार्डांचेही वितरण

सेवा पंधरवड्यानिमित्त भाजपचा उपक्रम

गडचिरोली : ‘सेवा सप्ताह पंधरवाडा’ या कार्यक्रमांतर्गत भारतीय जनता पक्ष गडचिरोली शहराच्या वतीने येथील रामनगर, तुकडोजी चौक (प्रभाग क्र.४) येथे रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी आणि आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी तथा वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे, किसान आघाडीचे प्रदेश सदस्य रमेश भुरसे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, शहराध्यक्ष कविता उरकुडे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी खासदार अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे व लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. तसेच बहुसंख्य नागरिकांनी शुगर, बीपी, नेत्र तपासणी, मुखरोग तपासणी, सिकलसेल इत्यादींची तपासणी करून घेतली. आभा कार्डचा लाभही घेतला. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या चमुने आरोग्य तपासणी करून उपचार पध्दती सांगितली. आशा सेविकांनी आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी करून कार्डचे वितरण केले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, शहर उपाध्यक्ष विवेक बैस, महिला आघाडी जिल्हा सचिव लक्ष्मी कलंत्री, महामंत्री वैष्णवी नैताम, रश्मी बाणमारे, शहर महामंत्री केशव निंबोड, माजी नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, कोमल बारसागडे, हर्षल गेडाम, सुरेश मांडवगडे, कवडूजी येरमे, विलास नैताम, अर्चना निंबोड, मंदा मांडवगडे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

रक्तदान शिबिरामध्ये संजय मांडवगडे, मंगेश मसराम, नरेश पिपरे, आकाश श्रीरामे, दिनेश भुरसे, ज्योतिर्मय कोहळे, अंकुश भुरसे, गौतम काळे, गिरीधर पराते, अमित हेमके, रुपेश पोरटे, हर्षद तांगडे, रुपेश चुनूरवार, अंकुश कुकुडकर, आनंद सातपुते, मनीषा कुंठावर, सागर बोधलकर, नितीन वडपल्लीवार, आनंद धोडरे यांनी रक्तदान केले. कार्यक्रमासाठी महिला आघाडी जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, बुथ प्रमुख संजय मांडवगडे, पुनम हेमके, विक्की कोवे यांनी परिश्रम घेतले.