अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना स्पर्धा परीक्षेचे विनामुल्य प्रशिक्षण

दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतनही

गडचिरोली : जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार तथा उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांच्या वतीने एमपीएससी स्पर्धापूर्व प्रशिक्षण, तसेच जिल्हा निवड समिती व इतर विविध पदभरतीच्या परीक्षांसाठी विनामूल्य परीक्षापूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रशिक्षणासाठी अर्ज करणारा उमेदवार शालांत परीक्षा (10 वी /12 वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याच्याकडे रोजगार नोंदणी कार्ड (Employment Card) असणे बंधनकारक आहे. प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महिने असून, दरमहा 1000 रुपये विद्यावेतनही दिले जाणार. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

यासाठी अर्ज विनामूल्य उपलब्ध असून, उमेदवारांनी 1 ते 27 मार्च 2025 या कालावधीत अर्ज भरून सादर करावा. त्यानंतर 28 मार्च रोजी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल, बॅरक क्र.2, गडचिरोली येथे मुलाखत घेण्यात येईल.

अधिक माहितीसाठी 8485814488 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकाऱ्यांनी केले आहे.