कुरखेडा : तालुक्यातील बेलगाव येथील एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर दोन युवकांनी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्या युवकांना पोलिसांनी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.
प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलगी ही नवव्या वर्गात शिकत आहे. ती दुपारी दुकानात चॉकलेट घेण्याकरीता गेली होती. तेथून घराकडे जाताना गावातील भावेश राजू कोरेटी (24 वर्ष) आणि मोरेश्वर नामदेव कोरेटी (24 वर्ष) या दोघांनी त्या मुलीचा हात धरून तिची छेड काढली. त्यानंतर तिला बाजुला नेऊन तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.
पीडित मुलीची तक्रार आणि साक्षीदारांच्या बयानावरून कुरखेडा पोलिसांनी भावेश व मोरेश्वर यांच्याविरोधात कलम 74, 3 (5) व पोस्को अंतर्गत कलम 8 व 12 नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.