गडचिरोली पॅरामेडीकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वितरण

संस्थेला 24 वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्त

गडचिरोली : येथील गडचिरोली पॅरामेडिकल कॉलेजध्ये वर्ष 2024-2025 मध्ये डी.एम.एल.टी. तसेच पी.जी. डी.एम.एल.टी. या कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्याऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश देण्यात आले. दि.2 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कौशल्य, विकास व उद्योजकता मंत्रालय, मुंबई तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई याद्वारे मान्यताप्राप्त भंडारा पॅरामेडिकल अकॅडमीला 24 वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्ताने त्याच संस्थेचा भाग असलेल्या गडचिरोली पॅरामेडिकल कॉलेज मध्ये सर्व पॅरामेडिकलच्या अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनिल कुर्वे, संचालिका अनुराधा कुर्वे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी गडचिरोली पॅरामेडिकल कॉलेजच्या प्राचार्या डॉ.दीप्ती के.वैद्य, प्रा.नलिना मेश्राम, प्रा.धनश्री देवळीकर, प्रा.भूषण राऊत, प्रा.सायली भांडेकर, प्रा.रचना संतोषवार, संजीवनी मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डीएमएलटी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी ऋतुजा अर्जुनकार हिने केले.