गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेची आता विद्यार्थ्यांसाठी स्वप्नसंचय योजना

अत्याधुनिक सेंटरचेही आज उद्घाटन

गडचिरोली : जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना विविध योजनांच्या माध्यमातून सवलतीच्या व्याजदराने कर्जवाटप करणाऱ्या गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून आता खास विद्यार्थ्यांसाठी स्वप्नसंचय योजना सुरु केली जात आहे.

या योजनेचा शुभारंभ व बँकेच्या अत्याधुनिक डाटा सेंटरचे उद्घाटन आज (दि.16) दुपारी 3 वाजता बँकेच्या मुख्य कार्यालयात जिल्हा परिषदेचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांच्या हस्ते आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी विलास कावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार अध्यक्षस्थानी राहतील, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी दिली.

गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यात 57 शाखांच्चा माध्यमातून जिल्ह्मातील 4 लाखांपेक्षा अधिक खातेदारांना अत्याधुनिक डिजीटल बँकींग सुविधा पुरवीत आहे. दि.31 मार्च 2024 च्या आर्थिक स्थितीत बँकेने 3500 कोटीच्या व्यवसायाचा टप्पा पार करत 4 हजार कोटीच्या व्यवसायाकडे वाटचाल सुरू आहे.