आरमोरी : एक राज्य नव्हे तर संपूर्ण भारतभूमी मुळ निवासी आदिम जमात असलेल्या आदिवासींची आहे. त्यांच्यावर कब्जा करु पाहणाऱ्या इंग्रजांविरुद्ध बिरसा मुंडांनी लढा दिला. आमच्या हक्क, अधिकारांसाठी जल, जमीन जंगलसाठी ते लढले. त्यामुळे तोच खरा आमचा भगवान, असे प्रतिपादन खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केले. येथील क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंती उत्सवानिमित्त आदिवासी समाज समिती जोगीसाखराच्या वतीने आयोजित गोंडी धर्म संमेलन व गोंडी समुह नृत्य स्पर्धेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी उद्घाटक म्हणून आ.रामदास मसराम, तर विशेष अतिथी म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, शिवसेना नेते हरीश मने, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, जावेद शेख, वनपरिक्षेत्र अधिकारी भुषनसिंह खंडाते, वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजकुमार कोरेटी, सरपंच संदीप ठाकुर, अभियंता कालीदास ढवळे, डॉ निलकंठ मसराम, प्रा.युवराज सयाम, डॉ.संजय ठेंगरी, पंचायत समितीच्या माजी सदस्य वृंदा गजभिये, केंद्र प्रमुख कैलास टेंभुर्णे, डेपो अधिकारी वालोदे, भारत कुमरे, रविशंकर ढोरे, शेषराव कुमरे, गिरिधर नेवारे, पोलीस पाटील राधाबाई सडमाके, आदिवासी समाज संघटक शरद मडावी आदी अनेक जण उपस्थित होते.
काळ जरी बदलला तरी आदिवासी संस्कृती बदलू नये, मात्र व्यसनमुक्त समाज व उच्चशिक्षित पिढी घडवणे यापुढे या संस्कृतीचा भाग झाला पाहिजे, असे प्रेरणादायी मार्गदर्शन आ.रामदास मसराम यांनी केले.
यावेळी खा.डॉ. नामदेव किरसान आणि आ.रामदास मसराम यांच्यासह मान्यवरांचा शाल, श्रीफळ व गोंडी धर्म वस्त्र देवुन आणि भारतीय सैन्यदलात भरती झालेल्या निलेश गोपाल नारनवरे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
गोंडी नृत्य स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 21 हजार रुपये बिरसा मुंडा डान्सगृप माननपुर कोहका (छत्तीसगड), व्दितीय 15 हजार रुपये आदिवासी डान्स राजनांदगाव, तर तिसरे बक्षीस 10 हजार रुपये कराडी येथील गृपने पटकावले. यात आधल्या दिवसी आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात 33 दात्यांनी रक्तदान केले. भव्य मिरवणुकीत मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. त्यानंतर सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील कुमरे यांनी, तर प्रास्ताविक जंकासचे अध्यक्ष दिलीप घोडाम आणि आभार प्रदर्शन योगेश कुमरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी योगेश कुमरे, सुनील कुमरे, सचिन कुमरे, रामु मडावी, महेंद्र पेन्दाम, मंगेश कुमरे, विवेक कुमरे, विनोद ऊईके, गुलाब सयाम, रत्नाजी पेदाम, अमर कुमरे, विकी मडावी, आकाश सयाम, बापू ऊईके, अतुल ऊईके, रामदास सयाम, लक्ष्मण सडमाके, अजय मडावी, पुरूषोत्तम ऊईके, मयुर मडावी यांसह गावातील पुरुष, युवक, महिला मंडळ, बचत गटाचे सहकार्य लाभले.