आयुर्वेद उत्कर्ष मंडळाने केली जारावंडीत आरोग्य जनजागृती

औषधी घेण्याऐवजी आजारीच पडू नका : डॉ.प्रमोद साळवे

मार्गदर्शन करताना आयुर्वेद उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष डाॅ.प्रमोद साळवे

एटापल्ली ः तालुक्यातील जारावंडी येथे आयुर्वेद उत्कर्ष मंडळ विदर्भ प्रदेश नागपूरच्या वतीने महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त १ मे रोजी आरोग्य जागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ.प्रमोद साळवे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. दिवसेंदिवस वाढत असलेली रोगराई, मलेरियाचे वाढते प्रमाण, कुपोषण तसेच माता मृत्यु याबाबत चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासन प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत असताना देखील यात अपेक्षित यश मिळत नसल्याने नागरिकांनी स्वतःची काळजी घेऊन आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवावी. आजारी पडून औषधोपचार घेण्यापेक्षा आजारीच पडू नये, याची खबरदारी घ्यावी, असा सल्ला यावेळी डॉ.प्रमोद साळवे यांनी दिला.

 मलेरिया होऊ नये म्हणून स्वच्छता, तसेच संपूर्ण आरोग्यासाठी पाण्याचे महत्व लक्षात घेता शुद्ध पाण्याचे सेवन, योग्य आहारविहार करून आपले आरोग्यसंवर्धन करावे, असे मार्गदर्शन डॉ.साळवे यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जारावडीचे पोलीस पाटील झनक माहामुरत होते. यावेळी बोलताना त्यांनी आरोग्य संवर्धनाकरीता आरोग्याची निगाराखणे अत्यंत आवश्यक असून जनतेच्या आरोग्यसंवर्धनासाठी आयुर्वेद उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद साळवे यांनी शिबिराच्या माध्यमातून नेहमी लक्ष देऊन मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी दूधमाळाच्या तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अनिल मेश्राम चातगावचे गुरुदेव शेडमाके यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रास्तविक डॉ.साळवे नर्सिंग कॉलेज स्कुह स्टुडन्ट असोसिएशनच्या अध्यक्ष निकिता सडमेक यांनी तर आभार प्रदर्शन दीप्ती बेलसरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अपर्णा तुलावी, मालती सिकदर, साक्षी मडावी तसेच जारावंडी येथील नागरीक एकनाथ चौधरी, निळकंठ निकुरे, श्रीकृष्ण मोहुर्ले, सखाराम वाडगुरे, महेश सिडाम, राजू मडावी, हर्षल मोहुर्ले, संजय मोहुर्ले, गणेश निकोडे, अशोक मोहुर्ले, कालीदास मोहुर्ले, भलाजी एनगंटीवार, योगेश सिडाम, राकेश कुमरे, गजानन गुरनुले, निळकंठ मोहुर्ले, मंगलदास मडावी, अतुल डोंगरवार, मालाबाई मोहुर्ले, सुभद्राबाई मोहुर्ले, जनकशा नाहामुरते इत्यादीनी सक्रिय कार्य केले.