उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कटाक्ष’चे लोकार्पण

गडचिरोली : डिजिटल माध्यम क्षेत्रात नव्याने दाखल झालेल्या ‘कटाक्ष’ या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात झाला. यावेळी खासदार अशोक नेते, जिल्हाधिकारी संजय मीना, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, कटाक्षचे मुख्य संपादक मनोज ताजने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्र्यांसह इतर अतिथी आणि अधिकाऱ्यांनी कटाक्षला शुभेच्छा दिल्या.