फुले दाम्पत्य प्रतिष्ठानने केला दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

ज्ञानवंतांसोबत सत्यशोधक होण्याचे आवाहन

गडचिरोली : येथील फुले दाम्पत्य प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षीच्या दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध शासकीय विभागात नोकरीवर लागलेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा माळी समाज संघटनेचे सल्लागार भीमराज पात्रिकर यांनी उपस्थितांना गुणवंत, ज्ञानवंत आणि सत्यशोधक होवुन सर्व समस्यांचे निराकरण स्वत: करण्यास तयार रहावे, असे आवहन केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी धर्मानंद मेश्राम यांनी 12 वी नंतर प्रवेश घेता येणाऱ्या सर्व फॅकल्टींची माहिती दिली. तसेच यवतमाळ येथील सत्यशोधक विज्ञापीठात जीवन बदलविणाऱ्या प्रशिक्षणात भाग घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली जिल्हा माळी समाज संघटनेचे अध्यक्ष फुलचंद गुरनुले, तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय लेनगुरे, गुरुदास बोरुले, पुरण पेटकुले होते. प्रास्ताविक अशोक मांदाडे, संचालन गिरीष लेनगुरे तर आभार उमेश जेंगठे यांनी मानले. यशस्वीतेसाठी रमेश जेंगठे, योगेश सोनुले, नरेंद्र निकोडे, किसन सोनुले, संतोष मोहुर्ले, शंकर चौधरी, लक्ष्मण मोहुर्ले,भाष्कर गुरनुले, इतर सर्वांनी मदत केली. कार्यक्रमास विद्यार्थी-पालक व समाजबांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

यावेळी खालील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

विविध शासकीय विभागात नोकरीवर निवड झालेल्या वैभव गुरनुले, भाग्यश्री मदनकर, मंगेश मोहुर्ले, सुरज मोहुर्ले, सागर गावतुरे, भाग्यश्री भेंडारे यांना सन्मानित करण्यात आले.

12 वी परीक्षेतील गुणवंत
आदित्य मोहुर्ले, सानिका गुरनुले, मंगेश भेंडारे, गायत्री गुरनुले, योगेंद्र कावळे, भुषण कोकोडे आणि थामदेव निकुरे.

10 वी परीक्षेतील गुणवंत
आस्था वाडगुरे, हिमांगी गुरनुले, मानसी सोनुले, सुजय मोहुर्ले, तेजस गावतुरे, जान्हवी मांदाडे, सायली मोहुर्ले, वैभवी सोनुले, हर्षाली मांदाडे, तनुश्री जेंगठे, चंदना निकोडे, जिज्ञासा जेंगठे, चैतन्या कोटरंगे, सोनी आदे, जान्हवी रस्से, गौरव मोहुर्ले, किशोर ढोले, कुमुदिनी मोहुर्ले, आस्था लेनगुरे, धिरज पेटकुले, प्रतिक जेंगठे.