खासदार डॅा.किरसान यांचे खासगी सचिव सुभाष निनावे यांचा सत्कार

गोंदिया जिल्हा व्यापारी संघटनेचे आयोजन

गडचिरोली : गोंदिया जिल्हा व्यापारी असोसिएशनचे सक्रिय सदस्य तथा सरकारी दूध योजना कार्यालयाचे सेवानिवृत अधीक्षक सुभाष निनावे यांची नवनिर्वाचित खासदार डॅा.नामदेव किरसान यांचे खासगी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याबद्दल गोंदिया जिल्हा व्यापारी असोसिएशनच्या वतीने त्यांचा उत्साहात सत्कार करण्यात आला.

निनावे यांनी यापूर्वी माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बड़ोले यांचे राजशिष्टाचार सहायक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. याशिवाय ते कर्मचारी-अधिकारी कल्याण संघ मंत्रालय मुंबईचे गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

व्यापारी असोसिएशनच्या चटोरा येथील कार्यालयात त्यांचा हा सत्कार सोहळा झाला. गोंदिया जिल्ह्यातील त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तालुक्यांमधील व्यापारी आणि नागरिकांच्या समस्या ते सोडवतील, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी संजय जैन, महेंद्र खंडेलवाल, राजा इसरका, राजेश्वर कनोजिया, मयूर भाटिया, सुनील अग्रवाल, सूर्यांश जैन, आनंद बरडिया, आनंद अग्रवाल, जितेंद्र खंडेलवाल, रवि लधानी, आयुष जैन, अंकित जैन, अंकित हत्त्तीमारे, रवि कनोजिया, प्रकाश सिंगी, संकेत जैन, दुर्गा सोनी, प्रवीण बैस, प्रदीप जायसवाल आदी व्यापारी प्रामुख्याने उपस्थित होते.