गडचिरोली : काँग्रेसच्या आदिवासी आघाडीचे प्रदेश सचिव म्हणून नुकतीच नियुक्ती मिळालेले छगन शेडमाके यांना गडचिरोली भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार सिने अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
या समारंभाला गडचिरोलीचे नवनिर्वाचित खासदार डॉ.नामदेव किरसान, लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष आणि माजी खासदार विजय दर्डा, माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, लोकमतचे संपादक श्रीमंत माने प्रामुख्याने उपस्थित होते. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्यासाठी शेडमाके यांना सदर पुरस्कार देण्यात आल्याचे शेडमाके यांनी सांगितले.