नागरी भागातील विकसित भारत संकल्प यात्रेला गडचिरोलीतून सुरूवात

खासदारांच्या हस्ते फित कापून शुभारंभ

फित कापून विकसित भारत संकल्प रथाचा शुभारंभ करताना खा.अशोक नेते

गडचिरोली : भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ ज्या लक्ष्यीत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले नाहीत अशा लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचण्याच्या उद्देशाने नागरी भागातील विकसित भारत संकल्प यात्रेला दि.२१ ला सुरूवात करण्यात आली. गोकुळनगरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात झालेल्या या कार्यक्रमात प्रचार रथाचा शुभारंभ खासदार अशोक नेते यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.डॅा.देवराव होळी, तर अतिथी म्हणून न.प.चे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, उपमुख्याधिकारी रविंद्र भंडारवार, माजी नगरसेवक प्रमोद पिपरे, निता उंदीरवाडे, मुक्तेश्वर काटवे, अनिल कुनघाडकर, केशव निंबोड, भाजप महिला आघाडीच्या रेखा डोळस, डॅा.भारत खटी, सामाजिक कार्यकर्ते दोंकुलवार, ज्येष्ठ नागरिक एकनाथ भोयर आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी विविध योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला. कार्यक्रमाला ११७५ लाभार्थी उपस्थित होते, असे मुख्याधिकाऱ्यांनी कळविले.