गडचिरोली : गडचिरोली शहरात आणि जिल्हाभरात अयोध्येतील नवनिर्मित श्रीराम मंदिरातील एेतिहासिक मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण लाखो लोकांनी पाहिले. खासदार अशोक नेते यांच्या निवासस्थानी आणि जनसंपर्क कार्यालयात एलईडी स्क्रिन लावून या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण अनेक लोकांनी अनुभवले. यावेळी खासदार अशोक नेते यांच्या वतीने भाविकांना मोतीचूरच्या लाडूचे वाटप करण्यात आले.
तत्पूर्वी गडचिरोली शहरातून काढलेल्या भव्य शोभायात्रेतही खा.नेते सहभागी झाले. सर्वोदय वॅार्डमधील श्रीराम मंदिरात त्यांनी पुजाअर्जा केली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, जिल्हा संघप्रचारक घिसुलाल काबरा, विश्व हिंदू परिषदेचे रामायण खटी, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, डॉ. भारत खटी यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी डॅा.शिवनाथ कुंभारे यांच्यासह अनेक क्षेत्रातील नागरिक आणि भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, रामभक्त जमले होते.
संध्याकाळी ६ वाजता चामोर्शी मार्गावरील खा.अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात श्रीरामाच्या प्रतिमेचे पुजन आणि दीपोत्सवचे आयोजन केले होते. यावेळी अनेक रामभक्तांनी सहभागी होऊन आनंद साजरा केला.