महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त गडचिरोली येथील पोलीस कवायत मैदानावर सोमवार १ मे रोजी मुख्य शासकीय समारंभात पार पडला. जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक निलोत्पल व इतर अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पोलीस जवानांनी मानवंदना दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी परेडचे निरीक्षण केल्यानंतर विकासाकडे वाटचाल करण्यासाठी शासकीय स्तरावर सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती देऊन जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या.