हजारो लोकांनी ऐकली पंतप्रधानांच्या मनातील गोष्ट

१०० व्या ‘मन की बात’साठी ठिकठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी

गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनातील गोष्ट, अर्थात ‘मन की बात’ हा कार्यक्रम रविवारी गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र पाहण्यात आला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘मन की बात’ चा हा १०० वा एपिसोड होता. त्यामुळे सर्वांना या कार्यक्रमाची उत्सुकता लागली होती. हा कार्यक्रम ऐकण्यासाठी गडचिरोली, अहेरीसह अनेक ठिकाणी एलसीडी स्क्रिन लावून व्यवस्था करण्यात आली होती.

खासदार अशोक नेते यांच्या निवासस्थानी भारत मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते, एसटी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते तथा प्रदेश किसान आघाडीचे सदस्य रमेश भुरसे, विमुक्त भटक्या जमाती मोर्चाचे जिल्हा महामंत्री गोवर्धन चव्हाण, माजी न. प. उपाध्यक्ष अरुण हरडे, भाजपचे माजी उपाध्यक्ष अनिल पोहनकर, दीपक सातपुते, नंदू काबरा, युवा मोर्चाचे खडसे, मनोरंजन हलदार, धनंजय तिरपुडे, ऋषी गायकवाड आदी पदाधिकारी व नागरिक, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक बूथ, शक्ती केंद्रांवरही मन की बात ऐकण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
अहेरीत अंब्रिशराव यांची उपस्थिती
अहेरी येथील माता कन्यका परमेश्वरी मंदिर सभागृहात १०० वा ‘मन की बात’ कार्यक्रम माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाला अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा, उमानुर, देचलीपेठा, कमलापूर, गुड्डीगुडम, पेरमिली, मेडपल्ली, आलापल्ली, नागेपल्ली, महागाव, वांगेपल्ली, देवलमरी या गावातून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.