मार्कंडा देवस्थानाच्या पुनर्बांधणीच्या कामाला लवकरच होणार सुरूवात

पुरातत्व विभागासोबत खा.नेते यांची चर्चा

गडचिरोली : पुरातत्व विभागातील तांत्रिक अडचणीमुळे गेल्या काही वर्षांपासून रखडलेले मार्कंडा देवस्थानच्या पुनर्बांधणीचे काम पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयाने दिली. खा.नेते यांची दिल्लीत पुरातत्व विभागाचे उपमहानिर्देशक तसेच बांधकाम विभागाच्या निर्देशकांसोबत यासंदर्भात अधिवेशनादरम्यान महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत मटेरियल व लेबर या दोन टेंडरसंदर्भात चर्चा करण्यात आली.

दरम्यान मटेरियल टेंडरची प्रक्रिया पूर्ण झालेली असून लेबर टेंडरची प्रक्रिया अवघ्या १५ ते २० दिवसात पूर्ण होणार असल्याची माहिती दिल्लीवरून पुरातत्त्व विभागाने पत्राद्वारे आता खासदार अशोक नेते यांना देण्यात आली. त्यामुळे अवघ्या एक महिन्यातच मार्कंडा देवस्थानच्या विकास कामाचे भूमिपूजन होऊ शकते, अशी माहिती खासदार नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयाने दिली.