गडचिरोली : जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील आणि राज्याबाहेरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडेश्वर मंदिराच्या पुनर्बांधणीच्या कामाला शुक्रवारी (दि.१) पुन्हा सुरूवात होणार आहे. यावेळी खा.अशोक नेते, जिल्हाधिकारी संजय मीना, हरणघाटचे मुरलीधर महाराज तथा पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
गेल्या 10 वर्षांपूर्वी भारतीय पुरातत्व विभागाच्या या मंदिर समुहातील काही मंदिरांची पडझड झाल्याने त्यांची डागडुजी आणि पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला होता. पण सुरूवातीला हे काम जोरात सुरू असताना गेल्या ५ ते ६ वर्षात हे काम पुरातत्व विभागाच्या तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे रखडले होते. खा.नेते यांनी त्यांच्याकडे यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर या कामासाठी नव्याने निविदा काढण्यात आल्या.
शुक्रवारी मंदिरात पुजा करून या कामाला सुरूवात होणार असल्याचे खा.नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयाने कळविले.