सर्वसामान्यांची दिशाभूल करणाऱ्या सरकारला धडा शिकवा- डॅा.किरसान

युवक-युवतींनी धरला काँग्रेसचा हात

सिरोंचा : तालुक्यातील टेकडामोटला येथे अनेक युवक-युवतींनी काँग्रेसचा हात पकडत पक्षप्रवेश केला. वाढती महागाई, बेरोजगारी, फोडाफोडीचे राजकारण ठेवणाऱ्या सरकारला धडा शिकवा आणि राज्यात, देशात काँग्रेस पक्षाची सत्ता आणा, असे आवाहन यावेळी प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ.नामदेव किरसान यांनी केले.

यावेळी प्रामुख्याने माजी आमदार पेंटारामा तलांडी, काँग्रेसचे अहेरी विधानसभा समन्वयक तथा माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, माजी समाजकल्याण सभापती सगुना तलांडी, बानय्या जंगम, आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हनुमन्त मडावी, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष नीता तलांडी, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष सतीश जवाजी, उपसरपंच रामचंद्र गोगल, राजेश पडला आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये राज पागे, धनंजय पागे, सुमन गोगुला, समय्या मोरला, नागेश गोगुला, चालपत जाडी, आनंदराव गोगुला, व्यंकटेश गोगुला, सडवली आईला, श्रीधर अंगाला, बापू जाडी, मनोहर गोगुला, नागेश अंबाला, समय्या गोगुला, अंबाला बनय्या या प्रमुख कार्यकर्त्यांसह इतर अनेक युवक, महिला आणि नागरिकांचा समावेश होता.