गडचिरोलीकर डॅाक्टरांची यावर्षीही बिनागुंडातील आदिवासींना सेवा

15 वर्षांपासून जपत आहेत परंपरा

गडचिरोली : सामाजिक दायित्वाच्या भावनेने जिल्ह्याच्या अतिदुर्गम अशा भामरागड तालुक्यातील बिनागुंडा येथे यावर्षीही डॅाक्टरांनी 1 मे रोजी आरोग्य तपासणी शिबिर घेतले. महाराष्ट् दिनाचे औचित्य साधून दरवर्षी राबविल्या जात असलेल्या या उपक्रमाला 15 वर्ष पूर्ण झाली आहेत.

धन्वंतरी हॅास्पिटलचे संचालक डॅा.अनंत कुंभारे, सिटी हॅास्पिटलचे संचालक डॅा.यशवंत दुर्गे, अस्थिरोगतज्ज्ञ डॅा.रोहन कुमरे, नेत्र तंत्रज्ञ राजू बट्टूवार, शान सरदार, फार्मसिस्ट हर्ष दांडेकर, सुसेन मुनगेलवार, हर्षल मडावी, कोमल उंदीरवार, कोमल उंदिरवार, प्रदीप हेडाऊ, परिमल हेडाऊ, आशिष चांदेकर, अनुप सरकार, एजाज पठाण, सचिन येनप्रेड्डीवार, अॅड.एन.लोडल्लीवार यांच्या पुढाकाराने हे शिबिर यशस्वीपणे पार पडले.

या शिबिरात नागरिकांच्या आरोग्य तपासणीसोबत त्यांना मोफत औषधीचे वाटप करण्यात आले. काही रुग्णांची डोळे तपासणी करून चष्म्यांचे वाटप करण्यात आले. एवढेच नाही तर कपडे, मच्छरदाण्यांचे वाटपही करण्यात आले. याशिवाय रक्त नमुने घेऊन मलेरिया तपासणीही करण्यात आली. गर्भवती महिलांसह एकूण जवळपास 200 नागरिकांनी याचा लाभ घेतल्याचे डॅा.अनंत कुंभारे यांनी सांगितले.