आदिवासी संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार- ना.आत्राम

मॅाडेलिंग स्पर्धेत अनेकांचा सहभाग

गडचिरोली : आदिवासी रूढी, परंपरा, संस्कृती जोपासणे आणि त्यांची ओळख कायमस्वरूपी टिकवून ठेवणे काळाची गरज आहे. त्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार, अशी ग्वाही राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली. ते गडचिरोलीत ‘कोया किंग अँड क्विन’ या मॉडेलिंग स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार देवराव होळी होते.

रंगमंचावर आरमोरी येथील झाडीपट्टी रंगभूमीवर कलावंत मोनिका सहारे, सामाजिक कार्यकर्ते वसंत कुळसंगे, देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी प्रा.अनिल धामोडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, सोनल कोवे, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे आदी उपस्थित होते.

यावेळी ना.धर्मरावबाबा म्हणाले, आदिवासी समाज देशासाठी वैभव आहे. या समाजाचा गौरवशाली इतिहास असून तो टिकवून ठेवणे काळाची गरज आहे. येणारी भावी पिढी त्यांचा आदर्श व प्रेरणा घेऊन विकासाकडे वाटचाल करतील असा आशावाद व्यक्त केला. आदिवासीच्या संस्कृतीचे दर्शन बाहेरच्यांना होण्यासाठी मॉडेलिंग शो याच्यासह चर्चा, परिसंवाद , संम्मेलने नागपूर, मुंबई यासारख्या शहरी भागात करण्याची सूचना त्यांनी केली.

अध्यक्षस्थानावरून आ.डॅा.देवराव होळी यांनी आदिवासी समाजाच्या परंपरा व प्रामुख्याने भाषा टिकवून ठेवून आपली ओळख जगाला दाखवून देऊ आणि समाजाचा सर्वांगीण विकास करू, अशी भावना व्यक्त केली.

(आदिवासी दिनाच्या शुभेच्छा पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)