गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या वतीने येथील शासकीय इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेत जागतिक आदिवासी दिन व गौरव सोहळ्याचे आयोजन शुक्रवार, 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता केले आहे.
या कार्यक्रमाला राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह खा.डॉ. नामदेव किरसान, आ.अभिजीत वंजारी, आ.सुधाकर अडबाले, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे आदींना अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
विशेष निमंत्रित म्हणून जिल्हाधिकारी संजय दैने, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह आदी उपस्थित राहणार आहेत, असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहुल मीना यांनी कळविले.
(आदिवासी दिनाच्या शुभेच्छा पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)