गडचिरोलीत मॉडेल डिग्री कॉलेजच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण शिक्षणाची जोड

सहसंचालक राहुल म्हात्रे यांचा आशावाद

गडचिरोली : प्रधानमंत्री राष्ट्रीय उच्चशिक्षण अभियानाचे सहसंचालक राहुल म्हात्रे यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या मॉडेल डिग्री कॉलेजच्या नवीन इमारतीला भेट दिली. या जिल्ह्यात मॉडेल डिग्री कॉलेजच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण शिक्षणाची जोड निर्माण होतेय, असा आशावाद व्यक्त करत त्यांनी या अभ्यासक्रमाविषयी समाधान व्यक्त केले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ.शशिकांत आस्वले, गोंडवाना विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ.अनिल चिताडे आणि महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.संदीप लांजेवार उपस्थित होते.

मॉडेल डिग्री कॉलेज गोंडवाना विद्यापीठाच्या नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित झाले आहे. महाविद्यालयाची पाहणी करण्याकरिता गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन यांनी भेट दिली. यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.