गडचिरोली : भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी भाजपच्या महिला आघाडीतर्फे प्रदेश चिटणीस रेखाताई डोळस यांच्या नेतृत्वात गडचिरोली शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. याशिवाय डॅाक्टर्स डे निमित्त उत्कृष्ट सेवा देणाऱ्या डॅाक्टरांचा सत्कारही करण्यात आला.
जिल्हा सामान्य रुग्णालयात गोरगरीब रुग्णांना चादर आणि फळांचे वाटप करण्यात आले. तसेच मातोश्री वृद्धाश्रमात गॅस शेगडी आणि फळांचे वाटप करून वृक्षारोपण करण्यात आले. तसेच डॅाक्टर्स डे निमित्त जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.सतीशकुमार सोळंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.दावल साळवे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.सुनील मडावी, वैद्यकीय अधिकारी डॅा.धुर्वे, साथरोग अधिकारी रूपेश पेंदाम, साथरोग अधिकारी डॅा.विनोद मशाखेत्री, वैद्यकीय अधिकारी डॅा.अमित साळवे आदींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी जि.प.समाजकल्याण सभापीत रंजिता कोडापे, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, माजी शहर अध्यक्ष पल्लवी बारापात्रे, रेखा ढवळे, भूमी भरडे, शिल्पा भोयर आदी महिला पदाधिकारी, तसेच विधानसभा प्रमुख प्रमोद पिपरे, प्रशांत वाघरे, डॅा.भारत खटी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.