स्पर्धेत टिकण्यासाठी जिद्द, चिकाटी आवश्यक- आमदार गजबे

पोटगावच्या जि.प.शाळेत पुस्तकांचे वाटप

देसाईगंज : बदलत्या काळानुसार शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षण हे जीवनाचे अविभाज्य अंग आहे. हे समजले तर विद्यार्थी जीवनात यशस्वी वाटचाल करून आयुष्यात यशस्वी झाले असे म्हणता येईल. आजचे युग स्पर्धेचे आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व संघर्ष करण्याची तयारी असेल तर विद्यार्थी टिकून राहतो, असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.

पोटगाव येथील जिल्हा परिषद शाळा येथे विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक वाटप कार्यक्रम व नवीन विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आमदार कृष्णा गजबे, सरपंच विजय दडमल, केंद्रप्रमुख कसबे, मुख्याधापक भोयर व शिक्षकवृंद उपस्थित होते.