गडचिरोली : सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी प्रसिद्ध असलेल्या गडचिरोलीतील अजब-गजब विचार मंचच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गडचिरोलीकरांना दोन स्वरमैफिलींची मेजवानी मिळणार आहे. आज, दि.28 ला संध्याकाळी दीपावली सांध्य मैफिल, तर उद्या, दि.29 ला पहाट मैफिलीचे सूर गुंजणार आहेत.
चंद्रपूर मार्गावरील विद्याभारती हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या संगीत महोत्सवात मराठी, हिंदी गीतांनी रसिक श्रोते न्हाऊन निघतील. आज संख्याकाळची मैफिल 6 वाजता, तर उद्या पहाटेची मैफिल 5 वाजता सुरू होईल. यात दिग्गज गायक सागर म्हात्रे, प्रणय पवार, अंकिता टकले, गीता पुराणिक, मुकूल पांडे, गणेश भगत हे गडचिरोलीकरांना तृप्त करतील.
या संगीत महोत्सवाचा गडचिरोलीकरांना आनंद घ्यावा, असे आवाहन अजब-गजब विचार मंचचे संतीश त्रिनगरीवार, आशुतोष कोरडे, सचिन मून, अरविंद कात्रटवार, सतीश विधाते, नंदकिशोर काथवटे, विश्राम होकम, सुभाष धंदरे, मिलिंद उमरे, सुरज खोब्रागडे, प्रवीण खडसे आदींनी केले.