अहेरी : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या संकल्पनेतून गरजूंना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्र्यांचे वाटप करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अहेरी विधानसभेतील विविध गावात मोठ्या प्रमाणात छत्र्यांचे वाटप करण्यात आले. माजी पं.स.सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्या हस्ते छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादीच्या विविध कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात मोठ्या प्रमाणात गरजू आणि तुटपुंज्या मिळकतीवर जगणाऱ्या कष्टाळू लोकांना छत्र्या भेट देऊन त्यांना पावसापासून बचाव करण्यासाठी मदत केली. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आलापल्लीत धर्मरावबाबा आत्राम यांचे पूत्र तथा माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम यांनी स्वतः गरजूंना छत्र्यांचे वाटप केले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव कैलाश कोरेत, अहेरी विधानसभा प्रमुख लक्ष्मण येर्रावार, माजी प्राचार्य रतन दुर्गे, तालुका कार्याध्यक्ष पराग पांढरे, माजी पेसा अध्यक्ष स्वामी वेलादी, सामाजिक कार्यकर्ते बाबुराव तोरेम, विनोद कोडापे, दीपक कन्नाके,अमोल उरेत, अक्षय मडावी, करण आत्राम, अमोल कन्नाके, रोशन उरेत, रमेश आत्राम, सुनिल नैताम, विनोद तलांडे, रोहित उरेत, चंदु मडावी, विनोद वेलादी, गोपाल कोरेत, सुनील मडावी, सुरज कुडमेथे, स्वप्निल शेटे, मारोती सडमेक, अमरदीप नुतीकटलावार, पवन तोगरवार, बबलू उईके, सिनू तोगरवार, पोशट्टी सुंकेवार, विजय चेरलावार, लक्ष्मण दुम्पलवार, रुपेश सल्लम, श्रीनिवास गंजीवार, बापू जंजरलावार, दीपक उईके, मल्लेश गंजीवार, दुर्गय्या कप्पलवार, नागेश कोम्पेल्ली, विठ्ठल बावणे, रमण जुट्टूवार, पोचम पल्लेम, वंदना मडावी, संगीता इष्टाम, रेशमा आत्राम, अर्चना मडावी, राजूबाई तलांडे, दुर्गाबाई आलाम, चंद्रकला आत्राम, कल्याणी नागपूरवार, रामबाई आलाम, संगीता कंनाके, सरिता सिडाम, पदमा नाईनवार, संगीता तलांडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.