Home दैनंदिन बातम्या सोमवारी मांस आणि मांसाहारी पदार्थांची विक्री राहणार बंद – मुख्याधिकारी

सोमवारी मांस आणि मांसाहारी पदार्थांची विक्री राहणार बंद – मुख्याधिकारी

छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्यांवर कारवाई

गडचिरोली : येत्या सोमवार, दि.२२ रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गडचिरोली शहरातील सर्व चिकन, मटन, मासे आणि इतर अनुषंगिक मांसाहारी पदार्थांची विक्री करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. या दिवशी खुल्या किंवा छुप्या पद्धतीने सदर मांसाहारी पदार्थांची विक्री करताना आढळून आल्यास संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करून व्यवसाय परवाना कायमस्वरूपी बंद करण्यात येईल, असा गंभीर इशारा गडचिरोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी दिला आहे.