सिरोंचा तालुक्यात उन्हाळी धान खरेदीला सुरूवात, अमरावतीत केंद्र सुरू

भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते शुभारंभ

सिरोंचा : तालुका मुख्यालयापासून 10 किमी अंतरावर असलेल्या अमरावती येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्राचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी त्यांच्यासोबत सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतीश गंजीवार, अमरावती आविकाचे अध्यक्ष मल्लय्या गावडे, उपाध्यक्ष इंगली नानय्या किष्टय्या, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, संस्थेचे सचिव सुधाकर भंडारी, बाजार समितीचे संचालक रवी राल्लाबंडीवार, राकाँचे तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी, नगरसेवक जगदीश राल्लाबंडीवार, नगरसेवक सतीश राचर्लावार, नगरसेवक सतीश भोगे, नगरसेवक रंजीत गागापूरपुवार, तसेच पदाधिकारी उपस्थित होते.