शेगावच्या राज्यस्तरीय बॅाक्सिंग स्पर्धेत पारस राऊतने पटकावले कांस्यपदक

75 ते 80 किलो गटात मारली बाजी

गडचिरोली : शेगाव (जि.बुलडाणा) येथे नुकत्याच झालेल्या वरिष्ठ गट बॅाक्सिंग राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत पारस हरिदास राऊत याने कांस्यपदक पटकावले. 75 ते 80 किलो वजनगटात पारसने हे यश संपादन केले. तो गडचिरोली जिल्हा बॅाक्सिंग प्रशिक्षण केंद्राचा खेळाडू आहे.

या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, यशवंत कुरूडकर, पंकज मडावी, संतोष गैनवार, महेश निलेकार, जिल्हा बॅाक्सिंग संघटनेचे जगदीश मस्के, प्रवीण मेश्राम, अनिल निकोडे, रजत देशमुख, संजय मानकर, निखिल इंगळे, सुरज खोब्रागडे आदींनी त्याचे अभिनंदन केले.