‘पेन्शनर्स डे’निमित्त सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार

आ.गजबे यांचा ज्येष्ठ नागरिकांशी संवाद

ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करताना आ.कृष्णा गजबे, सोबत मोतीलाल कुकरेजा

देसाईगंज : महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणे यांच्याशी संलग्नित सेवानिवृत्त कर्मचारी कल्याण संस्था देसाईगंज यांच्या वतीने ‘पेन्शनर्स डे’ निमित्त दि.१७ ला सत्कार समारंभाचे आयोजन श्री गजानन महाराज मंदिर देसाईगंज येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार गजबे यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांशी व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. या कार्यक्रमाप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, भाजपचे महिला जिल्हा उपाध्यक्ष शालू दंडवते, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते मुरलीधर सौंदरकर, सेवानिवृत्त कर्मचारी कल्याण संस्थेचे अध्यक्ष आर.एस. सोयाम, कार्याध्यक्ष के.ए. खान, उपाध्यक्ष एल.डी. नागदेवते, कोषाध्यक्ष पी.पी. शिंदे, सचिव बी.डी. सांगोळे, सहसचिव व्ही.पी. फुलबांधे, सदस्य जे. एस. रासेकर, सदस्य व्ही. जी.गोस्वामी, सदस्य के.एम. नाकतोडे, सदस्य एम.एस. माडावार, सदस्य एन. के. मेश्राम, सदस्य एन.एस.नेवारे, सदस्य एस.एस. बुल्ले, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच शहरातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.