गोंडवाना विद्यापीठात आंतरमहाविद्यालयीन संशोधन उत्सव ‘अविष्कार’चे आयोजन

दोन दिवसीय कार्यक्रमाचे बुधवारी उद्घाटन

गडचिरोली : विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी आंतरमहाविद्यालयीन संशोधन उत्सव ‘अविष्कार’चे आयोजन विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने दिनांक २० व २१ डिसेंबर २०२३ या कालावधीत गोंडवाना विद्यापीठात करण्यात आले आहे.

२० डिसेंबर रोजी सदर कार्यक्रमाचे उ‌द्घाटन सकाळी ११.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे व कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण हे राहतील. कार्यक्रमाचे उद्घाटन व्हीएनआयटी नागपूरचे प्रा.दिलीप पेशवे यांच्या हस्ते होणार आहे. २१ डिसेंबर रोजी बक्षीस वितरण होणार आहे.

या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन विद्यार्थी विकास विभागाच्या संचालिका डॉ.प्रिया गेडाम यांनी केले आहे.