आरमोरी : वैरागडवासियांचे आकर्षण असलेला भोलूभाऊ सोमनानी मित्र परिवाराच्या गणेशोत्सवात यावर्षी कबड्डी आणि भजन स्पर्धेसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांसह महाप्रसाद घेण्यासाठी सोमवारी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
गणेशोत्सवादरम्यान आयोजित कबड्डी स्पर्धा आणि भजन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना सोमवारी रात्री मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीसांचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार डॅा.देवराव होळी, माजी आ.हरिराम वरखडे, शिवसेनेचे (उबाठा) जिल्हा संपर्क प्रमुख महेश केदारी, जिल्हा प्रमुख (गडचिरोली विधानसभा) वासुदेव शेडमाके, भाजप नेते प्रमोद पिपरे, शिवसेनेचे प्रा.राजेंद्र लांजेकर, काँग्रेसचे वामनराव सावसाकडे, डॅा.मेघा सावसाकडे, सरपंच संगीता पेंदाम, सुषमा चिंचोळकर, सुधीर ठाणेकर, नलिनी सहारे प्रामुख्याने उपस्थित होते. यासोबत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गणेशदर्शन घेऊन महाप्रसाद ग्रहण केला.
मान्यवरांचे स्वागत बलराम (भोलू) सोमनानी, वैरागडच्या ग्रा.पं.सदस्य शितल सोमनानी, गौरी सोमनानी, माजी सरपंच वैशाली डोंगरवार, जान्हवी सोमनानी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन रामदास डोंगरवार यांनी केले.
स्पर्धांमध्ये हे ठरले विजेते
कबड्डी स्पर्धेत जय शिवाजी कबड्डी क्लब वाकडी यांनी प्रथम, जय बजरंग कबड्डी क्लब सालईटोला द्वितीय, तर जय बजरंगबली कबड्डी क्लब भेंडाळा यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
भजन स्पर्धेत श्री गुरूदेव सेवा भजन मंडळ विहीरगाव (कोडगाव) यांनी प्रथम, अखिल भारतीय गुरूदेव सेवा भजन मंडळ हिरापूर यांनी द्वितीय, तर सुरसंगम भजन मंडळ धाबेटेकडी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. बाल गटात श्री गुरूकृपा बाल भजन मंडळ सुकाळा यांना बक्षीस देण्यात आले. यावेळी वैरागडमधील अनेक भगिनींना भोलूभाऊ सोमनानी यांनी रक्षाबंधनानिमित्त भेटवस्तू दिल्या.
या कार्यक्रमासाठी सचिन लांजीकर, हितेश कुळसंगे, मिलिंद लांजीकर, नेताजी नेवारे, बादल व्यास, लकू सोमनानी, आशिष चौधरी, अजय चव्हाण, रितिक मलिक, असलम शेख, अमित कोडाप, संपत दासरवार, धरमदास सोमनानी आदींनी परिश्रम घेतले.