केंद्रीय सहायता निधीतून आंधळीत होणार राईस मिलची उभारणी

विदर्भातील एकमेव, आ.कृष्णा गजबे यांचे प्रयत्न

कुरखेडा : आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था आंधळी या संस्थेला केंद्रीय सहाय्यता निधीअंतर्गत शबरी आदिवासी व वित्त विभाग नाशिक यांच्याकडून राईस मिल मंजुर झाली. या मिल उभारणीच्या कामाचे भूमिपुजन बुधवारी (दि.६) आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले.

आमदार गजबे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने विदर्भात एकमेव आंधळी संस्थेला केंद्रीय सहायता निधीतून राईस मिल मंजूर करण्यात आले आहे. पाण्याची समस्या दूर करण्यासाठी आमदार निधीतून संस्थेला बोअरवेल मंजूर करून पाण्याची समस्या सोडविण्याची ग्वाही यावेळी आ.गजबे यांनी दिली.

याप्रसंगी आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, संस्थेचे सभापती केशव किरसान, उपसभापती विनोद खुणे, आंधळीच्या सरपंच उज्वला रायसिडाम, उपसरपंच अप्रव भैसारे, बेलगावचे सरपंच दिनकर कुमरे, व्यवस्थापक हेंमत सेंदरे, ग्रा.पं.सदस्य नानाजी खुणे, श्रावण भोंडे, रंजना पुसाम, संचालक जगननाथ जांभुळकर, संजय कवाडकर, दशरथ लाडे, मुरारी मानकर, सखाराम चौरीकर, वाल्मिक वल्के, तसेच गावातील उदाराम कवाडकर, दिगांबर नाकाडे, खुशाल कवाडकर, पुंडलिक परशुरामकर, रामचंद्र खुणे, सितकुरा गाळगोणे, रमेश नाकाडे, नारायण नाकाडे, केशव भोंडे, व्यवस्थापक मस्के, लिपिक मानिक दरवडे व गावकरी मंडळी उपस्थित होते.