बिहीटेकला येथे केंद्रस्तरीय शालेय क्रीडा तथा सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन

आ.कृष्णा गजबे यांच्या हस्ते उद्घाटन

कोरची : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बिहिटेकला येथे केंद्रस्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलनाचे आयोजन २८ ते ३० जानेवारीपर्यंत करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच किशोर नरोटे, प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच जगदीश कपूरडेरिया, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोहर कोराम तसेच केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्यगण, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.