गडचिरोली : गडचिरोली जिल्हा बॉल बॅडमिंटन संघटनेचे खेळाडू चंद्रपूर येथे होणाऱ्या 45 व्या सब ज्युनिअर बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. या खेळाडूंना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगरपरिषद पाणीपुरवठा व जलनिस्सारण सभापती लीलाधर भरडकर यांच्याकडून टी-शर्टचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी भरडकर यांनी खेळाडूंना स्पर्धेमधील यशासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला बॉल बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश संग्रामे, बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकारी सदस्य प्रा.रूपाली पापडकर, सचिव ऋषिकांत पापडकर, आशिष निजाम, प्रवीण पोयाम, विपुल उंदीरवाडे, विनय कोवे इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी गडचिरोली जिल्हा बॉल बॅडमिंटन संघाची घोषणा करण्यात आली.
मुलांच्या संघात यथार्थ लांडे (संघनायक), कौतिक निंदेकर, स्वरांश आयलवार, भूषण नंदनवार, जय हलदर, शिवम शनिवारे, प्रसन्न भागडकर, कुश बंचपल्लीवर, नृप उंदीरवाडे, योग नैताम, आशिष निजाम )(प्रशिक्षक), सुमित आलम (व्यवस्थापक) यांचा समावेश आहे.
मुलींच्या संघात सुप्रिया जुवारे (संघनायक), राधिका मगरे, निधी जांभुळकर, मोहिनी पिंपरखेडे, माधवी करते, श्रेया होळी, शर्वरी यंपलवार, अनाया धाकडे, आनिया आंबटकर, कृतिका तिवारी, प्रा.रूपाली पापडकर (प्रशिक्षक), लावण्या प्रेमळवार (संघ व्यवस्थापक) यांचा समावेश आहे.
































