गडचिरोलीतील सीआरपीएफ बटालियनमध्ये रंगली पश्चिम विभागीय रस्सीखेच स्पर्धा

मुंबई बटालियनचा रोमांचक विजय

गडचिरोली : गडचिरोलीत नक्षलविरोधी अभियानासाठी कार्यरत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) १९२ बटालियनच्या वतीने आंतरबटालियन रस्सीखेच (टग आॅफ वॅार) स्पर्धेचे आयोजन केले होते. यात अंतिम सामन्यात १०२ बटालियन मुंबई यांनी १९२ बटालियनवर मात करत ही स्पर्धा जिंकली.

एमआयडीसी परिसरातील सीआरपीएफच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन केले होते. पश्चिम विभागातील अनेक बटालियन यात सहभागी झाल्या होत्या. दि.१४ ला झालेल्या सेमिफायनल मध्ये १९२ बटालियन गडचिरोली आणि १०२ बटालियन मुंबई यांनी बाजी मारून अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला. या दोन संघात नंतर अंतिम सामना झाला. त्यात मुंबई संघाने २-० असा रोमांचक विजय मिळवत यजमान १९२ बटालियनच्या संघाला पराभूत केले.

सीआरपीएफचे डीआयजी जगदीश नारायण मीना यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांना ट्रॅाफी आणि मेडलचे वितरण करण्यात आले. यावेळी इतरही अधिकारीगण उपस्थित होते.