सभापती अजय कंकडालवार यांच्याकडून गावळे कुटुंबाला उपचारासाठी मदत

अहेरी : तालुक्यातील मेडपल्ली ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या गुर्जा येथील डोबी विज्या गावळे यांना काही दिवसाअगोदर मूत्रपिंडाचा त्रास चालू होता. सुरूवातीला लक्ष न दिल्यामुळे हा त्रास वाढला. त्यामुळे उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे आणले असता त्यांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले. पण आर्थिक परिस्थितीने पुढील उपचार घेणे शक्य नसल्याचे पाहून अजय कंकडालवार यांनी आर्थिक मदत केली.

घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असल्याने त्यांना उपचार घेण्यासाठी आर्थिक अडचण येत होती. डोबी विज्या गावळे यांच्या प्रकृतीची माहिती गुर्जा येथील आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष व अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांना दिली. माहिती मिळताच त्यांचे वडील विज्या गावळे यांना अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात बोलावून रुग्णालयात उपचार करण्याकरिता आर्थिक मदत केली.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, नागेपल्ली ग्रामपंचायतचे सदस्य तथा अहेरी बाजार समिती संचालक राकेश कुळमेत, अहेरीचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, रमेश डोके, पलो पाटाळी, लचु गावळे, नरेंद्र गर्गम, राकेश सडमेक यांच्यासह आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.