गडचिरोली : तालुक्यातील चांदाळाच्या आश्रमशाळेच्या सभागृहात केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत धरती आबा जनजागृती उन्नत अभियान, तसेच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आले. यात जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जॉब कार्ड वाटप, आरोग्य शिबिर, कला कौशल्य शिबिर झाले.
या शिबिरांच्या उद्घाटनाप्रसंगी खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व जॉब कार्डचे वाटप करून वृक्षारोपण करण्यात आले. (अधिक बातमी खाली वाचा)

या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा निरीक्षक सचिन नाईक, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, तहसीलदार संतोष आष्टीकर, पर्यवेक्षक शशिकांत जाधव, नायब तहसीलदार चंदू प्रधान, गटविकास अधिकारी अनिकेत पाटील, नायब तहसीलदार शेख, वैद्यकीय अधिकारी डॅा.करेवार, सुरज बांबोळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.