गडचिरोली : येथील रामनगरातील पांचाळ सेवा समितीच्या वतीने प्रभु विश्वकर्मा मूर्तीची प्रतिष्ठापना दिवस व विश्वकर्मा जयंती महोत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते उपस्थित होते.
विश्वकर्मा सभागृहाची भेट आनंददायी– अशोक नेते
याप्रसंगी बोलताना मा.खा.अशोक नेते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुशल कारागिरांसाठी ‘विश्वकर्मा योजना’ सुरू केली आहे. या विश्वकर्मा योजनेत पांचाळ समाजसुद्धा मोडतो. हा समाज कारागिरी व विविध कलेत निपुण आहे. पांचाळ समाजाच्या सभागृह बांधकामासाठी मी खासदार फंडातून पाच लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यामुळे सभागृहाची उभारणी होऊन भगवान विश्वकर्माचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले याचा मला विशेष आनंद आहे, अशी भावना व्यक्त करत नेते यांनी भगवान विश्वकर्माची विधीवत पूजा-अर्चा करून सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याला आ.डॉ. मिलिंद नरोटे, माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम यांच्यासह पांचाळ समाजाचे अध्यक्ष प्रभाकर किरमिरवार, सचिव प्रफुल्ल विरगमवार, उपाध्यक्ष निलेश बद्देलवार, कोषाध्यक्ष सचिन चुलुरवार, विजेंद्र कंठीवार, अविनाश विश्रोजवार, राकेश राचमलवार, रविंद्र किरमिरवार, रविंद्र शुद्धलवार, रविंद्र श्रीपदवार, योगेश देवोजवार, सचिन देवोजवार, टिकेश श्रीपदवार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चिमुकल्यांनी सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र आणि बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या सोहळ्याला पांचाळ समाजबांधव, महिला आणि बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक उत्साह, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.