मार्कंडादेव येथे जलाभिषेक, महापूजा व विविध उपक्रम

अहिल्याबाई त्रिशताब्दी जयंती

चामोर्शी : “विदर्भाची काशी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे भाजपच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशाब्दी जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम पार पडला. (सविस्तर बातमी खाली वाचा)

यावेळी माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्या हस्ते श्री मार्कंडेश्वर ऋषींच्या गाभाऱ्यात जलाभिषेक व महापूजा करण्यात आली.

यानिमित्ताने जगन्नाथ बाबा मठ्ठ देवस्थान येथून भक्तिमय वातावरणात पारंपरिक भजनासह दिंडी काढण्यात आली. या दिंडीत सहभागी भक्तांनी महामृत्युंजय मंत्राच्या घोषात जलाभिषेक पूजा केली. त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने भाजप व महिला मोर्चाच्या वतीने मार्कंडा देवस्थान परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यात विशेष महाजलाभिषेक व अभिषेक पूजा कार्यक्रमात, मंदिर व परिसर स्वच्छता अभियान, नदी घाटावर जलपूजन सोहळा, महिला मेळावा व मार्गदर्शन सत्र, महाप्रसाद वाटप या सर्व उपक्रमात महिला, युवक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आ.डॉ.देवराव होळी, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, प्रदेश सचिव रेखा डोळस, जिल्हा महामंत्री तथा मागी नगराध्यक्ष योगिता पिपरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गिता हिंगे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे, तालुकाध्यक्ष रोशनी वरघंटे, राकेश सरकार, मार्कंडाच्या सरपंच संगीता राजू मोगरे, आनंद भांडेकर, नरेश अल्सावार, रेवनाथ कुसराम, सोपान नैताम, भास्कर बुरे, निरज रामानुजवार, भाविक आभारे, रंजिता कोडापे, पल्लवी बारापात्रे, कविता उरकुडे, वर्षा शेडमाके यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.