गडचिरोली : भोपाळ येथे झालेल्या चौथ्या स्क्वे मार्शल आर्ट नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत गडचिरोलीच्या यशराज धर्मदास सोमनानी याने कौशल्य या प्रकारात महाराष्ट्राचे नेतृत्व करत 40 पैकी 34.5 गुण प्राप्त करून सुवर्णपदक पटकावले.
स्क्वे मार्शल आर्ट फेडरेशन आॅफ इंडियाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश, अंदमान-निकोबार, उत्तराखंड, आसाम, केरळ, नागालँड, कर्नाटक अशा 15 राज्यातील 400 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
यशराज हा सध्या पुणे येथील भारती विद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय आई माधुरी सोमनानी, वडील धर्मदास सोमनानी, प्रशिक्षक तथा स्क्वे मार्शल आर्ट फेडरेशन संघटनेचे कोअर कमिटी सदस्य संदीप पेदापल्ली यांना दिले आहे. या कामगिरीसाठी महाविद्यालयाचे प्रा.डॅा.आर.एल.पाटील, विभाग प्रमुख डॅा.लिना चौधरी व शिक्षकवृंदांनी कौतुक केले.































