विविध उपक्रमांनी साजरा झाला माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचा वाढदिवस

सिरोंचा / मूलचेरा : आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवाराचे नेते, गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांचा वाढदिवस सिरोंचा, मुलचेरा तालुक्यासह अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप, तसेच येथील जिल्हा परिषद मुलांची व कन्या शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना नोटबुक, पेनचे वितरण करून तसेच अंगणवाडी केंद्रातील चिमुकल्यांना चॉकलेट वाटण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात नव्याने रुजू झालेले वैद्यकीय अधिक्षक डॉ.किरणकुमार वाघमारे व वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विन वालके यांच्या हस्ते फळ वाटपाची सुरूवात करण्यात आली. नोटबुक व पेन वितरणाचा शुभारंभ मुख्याध्यापिका बी.आर.नैताम यांच्या हस्ते करण्यात आला.

ग्रामीण रुग्णालयातील कार्यक्रमाला पेंटींपाका ग्राम पंचायतचे सदस्य सोमय्या गादे, डॉ.प्रवीण मडावी, मलेरिया तांत्रिक कक्षसेवक एस.एस.बोल्ले, कक्षसेवक एम.एस.तांदुळकर, औषधी निर्माता रमेश वेलादी, सुरक्षारक्षक एम.डी.बावनवाळे, प्रसाद बतुला, महेश पोक्कुरी तर जिल्हा परिषदेच्या दोन्ही शाळेत शिक्षिका एस.आर.पस्पुनूरवार,अंगणवाडी सेविका बानू बंदेला, सायरा बानो, रामबाई कोठारी, किश्वर शेख, सुमन तोकला, माधवी मादरबोईना आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमांसाठी आविसं सल्लागार व माजी उपसरपंच रवी सल्लम, सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नागराजु इंगिली, नारायणपूर ग्राम पंचायतीचे उपसरपंच अशोक हरी, ग्राम संवाद सरपंच संघटनेचे विभागीय अध्यक्ष किरणकुमार वेमुला, रवी बोगोनी, सागर कोठारी, सडवली जंगम, शेखर पट्टेम, सुखदेव मुतूनूरी, अजय कंकडालवार यांचे सोशल मीडिया समन्वयक संपत गोगुला, आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

मूलचेरा ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप

सामाजाची नाळ ओळखून आदिवासीबहुल भागात मूलभूत सोयीसुविधांसोबतच सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारे, शिक्षण, सिंचन, आरोग्य हे ब्रीद घेऊनच राजकिय क्षेत्रात पाऊल टाकून “गावं तिथे विकास” या उक्तीप्रमाणे जीवनाचे ध्येय समजून कार्य करणाऱ्या अजय कंकडालवार यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय मूलचेरा येथे बिस्किटे व फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी मूलचेरा नगर पंचायतच्या बालकल्याण सभापती जास्वंदा गोंगले, नगरसेवक संतोष चौधरी, नगरसेवक बंडू आलम, कोठारीच्या सरपंच रोशनी कुसनाके, ग्रामपंचायत सदस्य कालिदास कुसनाके, पल्लवी रातनपुरे, सुनीता बानोत, जीवनकला तलांडे, माजी उपसरपंच रवी झाडे, सामाजिक कार्यकर्ते सुबोल मंडल, विनोद बानोत, संदीप रातनपुरे, रामलू भुईया, लाचहुराम घुग्लोत यांच्यासह आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.