‘महाविजय’साठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भाजपची बुथ सशक्तिकरणावर भर

देसाईगंजमध्ये झाला आरमोरी क्षेत्रातील मेळावा

देसाईगंज : आगामी निवडणुकांसाठी भाजपची जोमाने तयारी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘महाविजय-२०२४’ या अभियानांतर्गत आरमोरी विधानसभा क्षेत्रातील बुथ पालकांचा मेळावा येथील सिंधू भवनात झाला. बुथ पालकांनी बुथ सशक्तिकरण करून पक्षाचे काम प्रभावीपणे करावे. दिलेल्या जबाबदारीचे काटकोरपणे पालन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील कामे आणि लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्या, असे आवाहन यावेळी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी केले.

यावेळी मंचावर आ. कृष्णा गजबे, सहकार नेते तथा आरमोरी विधानसभा संयोजक प्रकाश सा.पोरेड्डीवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभेचे संयोजक किशन नागदेवे, लोकसभा संयोजक विरेंद्र अंजनकर, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलु हुसैनी, जिल्हाध्यक्ष (अनु.जाती) अॅड.उमेश वालदे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, वडसा तालुकाध्यक्ष सुनील पारधी, आरमोरी तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, कुरखेडा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, कोरची तालुकाध्यक्ष नसरूद्दीन भामानी, जिल्हा सचिव गणपत सोनकुसरे, शहराध्यक्ष सचिन खरकाटे तसेच मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.