‘आधुनिक भारताच्या निर्मितीत पंडीत नेहरू आणि इंदिरा गांधी यांचे योगदान’

गडचिरोलीत रंगली निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा

गडचिरोली : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून गडचिरोलीत काँग्रेसच्या वतीने त्यांच्या योगदानावर निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. यात अनेक विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन चांगला प्रतिसाद दिला.

पंडीत नेहरू आणि इंदिरा गांधी यांचे कार्य व त्यांच्या दृष्टीकोनातून तत्कालीन परिस्थितीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती येणाऱ्या पिढीपर्यंत पोहचविण्याकरीता गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन कात्रटवार सभागृहात केले होते. स्पर्धेचे उदघाटन माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, तर मुख्य अतिथी म्हुणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ.नामदेव किरसान यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक गणेश कोवे (गडचिरोली), द्वितीय अंकित बांबोळे (गडचिरोली), तृतीय विशाल मेश्राम (गडचिरोली), तर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आकाश कडूकर (चंद्रपूर), द्वितीय विनय पाटील (नागपूर) आणि तृतीय वृषभ मेश्राम (गडचिरोली) यांनी पटकावला. सर्व विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे 5000 रुपये, 3000 रुपये आणि 2000 रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत प्रोत्साहन पुरस्कार देऊन प्रसाद म्हशाखेत्रीला गौरविण्यात आले.

स्पर्धेचे परीक्षण अॅड.कविता मोहरकर, सेवानिवृत्त नायब तहसीलदार प्रभाकर कुबडे आणि प्रा.डॉ.पंकज नरुले यांनी केले. स्पर्धेचे सूत्रसंचालन अनुप कोहळे यांनी केले.