सिरोंचा : नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोक नेते यांचा तेलंगणा राज्यातील चेनूर येथे तेथील नगराध्यक्ष नवाज उद्दीन यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. भाजपच्या 2 जानेवारी रोजी सिरोंचा येथे होणाऱ्या कार्यशाळेसाठी येत असताना नेते यांचा हा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा उपाध्यक्ष दामोदर एरिगेला, तेलंगणातील माजी सरपंच सादनबोईन कृष्णा, भाजपचे युवा नेते शारिकभाई तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
अशोक नेते यांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देत कार्यकर्त्यांना पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. उपस्थित मान्यवरांनीही सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
2 जानेवारी रोजी सिरोंचा येथे भाजपची सदस्य नोंदणी मोहिम व कार्यशाळा होणार आहे. तेलंगणातील कार्यकर्त्यांनीही कार्यशाळेला येण्याचे आवाहन यावेळी नेते यांनी केले. त्याला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी होणार दिला.